अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे निकष काय? जाणून घ्या…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी अखेर या मागणीला यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. चला तर मग आता जाणून घेऊयात – अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचे निकष, त्याचे फायदे…
Marathi has the status of Abhijat Bhasha classical language

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा?

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सेंटरऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येते.
अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

Marathi language has the status of classical language

अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे निकष काय?

एखादी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी त्या भाषेचा इतिहास हा अतीव प्राचीन असावा. म्हणजेच त्या भाषेचा इतिहास हा जवळपास 1500 ते 2000 वर्षे इतका जुना असावा.
प्राचीन साहित्य हवे. जे त्या भाषिकांना मौल्यवान साहित्य वाटते.
दुसऱ्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.

Marathi language has the status of classical language

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने कोणते बदल होतात?

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या वेबसाइटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी काय फायदे सांगितले आहेत. ते पाहुयात….

मराठी बोली भाषांचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे.
भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.
महाराष्ट्रातील सर्व 12000 ग्रंथालयांना सशक्त करणे.
मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा सर्वांनाच भरीव मदत करणे.

Marathi language has the status of classical language

Leave a Comment