सूरज चव्हाण हा बिग बॉस सीजन 5 चा विजेता ठरला आहे. गेल्या 70 दिवसांपासून सूरज चव्हाण हा बिग बॉसमध्ये आपला करिश्मा आजमावत होता. पण या बिग बॉसच्या सर्वच टास्कमध्ये सर्वांना उरुण पुरणारा गावाकडचा एक अशिक्षित पोरगा हा आज एका रिऍलिटी शोचा विजेता ठरला आहे. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. Suraj Chavhan Big Boss Season 5 Winner
सूरजमुळे बिग बॉसची लोकप्रियता वाढली
सूरज हा एका रिऍलिटी शोचा विजय ठरला. त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील जनता ही आनंदोत्सव साजरा करत होती. खरंतर सूरज ज्या दिवसापासून बिग बॉसच्या सीजनमध्ये गेला. त्याची पहिली एन्ट्री झाली. त्या दिवसापासूनच अनेक लोकांनी बिग बॉस पाहण्यास सुरुवात केली. यापूर्वी ज्या लोकांना बिग बॉस म्हणजे काय असतं. हेदेखील माहिती नव्हते. ते सर्व गावाकडची मंडळी हा शो बघायला लागले होते. Suraj Chavhan Big Boss Season 5 Winner
सूरजच्या साधेपणाची महाराष्ट्राला भुरळ
सूरजचा पहिला दिवस असो की शेवटचा दिवस तो त्याच्या साधेपणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यामुळेच सूरजला एकेकाळी नाव ठेवणारी मंडळीदेखील तो नेमका कशामुळे एवढ्या मोठ्या शोचा भाग झाला. हे पाहण्यासाठी आतुर झाली होती. सूरज बिग बॉस हे एकटा जिंकलेला नाही. तर तो जिंकल्यामुळे गावातील प्रत्येक खेडकर मुलाला याबद्दल अभिमान वाटला आणि ही खरंतर या महाराष्ट्रासाठी अत्यंत गर्वाची बाब आहे. Suraj Chavhan Big Boss Season 5 Winner
एका अशिक्षित तरुणाचा विजय
सूरज हा पहिला असा विजेता असेल. जो एक अशिक्षित तरुण आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय शोमध्ये कधीही एखाद्या अशिक्षित व्यक्तीला प्रवेश मिळाला नसेल. पण सूरजला बिग बॉसने शोमध्ये प्रवेश दिला. तर प्रवेश दिलाच नाही. त्यासोबत या सूरज चव्हाणने ही ट्रॉफीही आपल्यानावे केली. Suraj Chavhan Big Boss Season 5 Winner
रितेश देशमुखने घेतला पहिला सेल्फी
सूरजला विजेता घोषित करताच रितेशने स्टेजवरच त्याच्याबरोबर सेल्फी घेतला. बिग बॉस मराठीचं विजेतेपद जिंकल्यानंतर रितेशने सूरजसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. रितेशने बिग बॉस मराठीच्या मंचावरील अभिजीत आणि सूरजबरोबरचा सेल्फी त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने “बिग बॉस मराठी विनर सूरज चव्हाण तर रनर अप अभिजीत सावंत” असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर अभिजीत सावंतने इमोजी कमेंट केली आहे.
सूरजला किती बक्षीस मिळाले?
बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावलेल्या सूरजला ‘बिग बॉस मराठी 5’चा लोगो असलेला डोळा आणि पाठीमागे यंदाची थीम असलेलं चक्रव्यूह अशी यंदाच्या पर्वाची ट्रॉफी मिळाली आहे. या ट्रॉफीबरोबरच विजेत्याला 14.60 लाख रुपये मिळाले आहेत. तर इलेक्ट्रिक स्कूटरही सूरजला मिळाली आहे. Suraj Chavhan Big Boss Season 5 Winner
सर्वांना गोलीगत धोका देत सूरज जिंकला ट्रॉफी
अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट होतं. सूरजने ट्रॉफी जिंकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. तर इंडियन आयडॉलनंतर रिएलिटी शोचा विजेता होण्याचं अभिजीत सावंतचं स्वप्न मात्र थोडक्यात हुकलं. अभिजीत बिग बॉस मराठी 5 चा उपविजेता ठरल्याने त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. Suraj Chavhan Big Boss Season 5 Winner