राज्यातील महायुती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. त्यात आता सरकारने बदल केला आहे. तो बदल असा आहे की, एका कुटुंबातील दोन महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी सरकारने केवळ एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे या बदलाने एका कुटुंबातील दोन महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येऊ शकणार आहे. तर आता जाणून घेऊयात तुम्ही या योजनेचा फॉर्म घरच्या घरी कसा भरू शकाल ते… Ladki Bahin Yojna Form Update
फॉर्म कसा भरावा?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो अर्ज देण्यात आला आहे, त्यावर इतर सरकारी कामांसाठी आपण ज्याप्रकारे वैयक्तिक तपशील भरतो, तीच पद्धत वापरायची आहे. या फॉर्ममध्ये महिलांना आधी त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्म ठिकाण, पिनकोड ही माहिती भरावी लागेल. याशिवाय, तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकही न विसरता अर्जात नमूद करावा. याशिवाय अर्जात महिलांना वैवाहिक स्थितीची माहिती देणेही बंधनकारक आहे. Ladki Bahin Yojna Form Update
याशिवाय, या अर्जात तुम्ही कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. एखादी महिला सरकारी योजनेची लाभार्थी असेल तर तिला संबंधित योजनेच्या माध्यमातून महिन्याला किती पैसे मिळतात, हे अर्जात नमूद करावे लागेल. Ladki Bahin Yojna Form Update
यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला ज्या बँक खात्यामध्ये हवे आहेत, त्याचा तपशील भरावा लागेल. यामध्ये बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खात्याचा क्रमांक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित बँकेचा IFSC Code हे सर्व तपशील अचूक भरावे लागतील.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला असणे आवश्यक आहे. त्याचा तपशीलही अर्जात नमूद करावा लागेल. सगळ्यात शेवटी अर्ज भरणारी महिला कोणत्या वर्गात मोडते, हे स्पष्ट करावे लागेल. अर्ज भरणारी महिला सामान्य गृहिणी असेल किंवा ती सरकारी नोकर नसेल तर सामान्य गृहिणी या पर्यायासमोर खुण करावी. Ladki Bahin Yojna Form Update
कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार?
-महाराष्ट्र रहिवासी
-विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
-लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
-60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
कोणत्या महिला अपात्र असतील?
-2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
-घरात कोणी Tax भरत असेल तर
-कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
-कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
-कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )
आवश्यक कागदपत्रे-
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र
योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे.
ज्यांना अर्ज करता येत नाही, त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल. Ladki Bahin Yojna Form Update