लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा लाभार्थ्यांना घरी पोहोचणार

सातारा : राज्य शासनाने 1 जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील महिलांची माहिती घेतली जाणार आहे. अशाप्रकारची मोहीम हाती घेतलेला सातारा जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेवेळी ही माहिती दिली. ladki bahin yojna

घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणारा राज्यातील पहिला जिल्हा सातारा

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, या सर्वेक्षणासाठी अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी हे घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार आहेत. तसेच, पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागेवरच अॅपच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. शासनाने या योजनेच्या अटी शिथिल केल्या आहेत. तसेच लागणारी कागदपत्रे ही कमी केली आहेत. त्यामुळे या योजनेचा अर्ज भरणे सोपे झाले आहेत. ladki bahin yojna

यंत्रणा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन अर्ज भरणार

अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी शासकीय कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करून जागेवर अर्ज भरण्याची प्रक्रिया करतील. आता डोमिसाइल प्रमाणपत्राचा पर्याय म्हणून 15 वर्ष जुने रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र ही चालणार आहे. त्यामुळे महिलांनी कागदपत्र काढण्यासाठी शासकीय कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता भासणार नाही. ladki bahin yojna

नवीन निकषांनुसार कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यात किमान पन्नास कुटुंबांमध्ये एक शासकीय कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करेल. यामुळे जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले. महिलांनी कोणतीही घाई न करता घरोघरी लाभ देण्याच्या या मोहिमेत सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. ladki bahin yojna

Leave a Comment