मराठा आंदोलनासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन मराठा आंदोलनासाठी सुरू केलेला लढा थांबवण्यासाठीची घोषणा केली आणि त्यांचं उपोषण याच ठिकाणी ज्यूस पिऊन थांबवण्यात आलं. मात्र त्याच्या एक दिवस अगोदर मनोज जरांगे यांनी मटन खाल्लं होतं, असा आरोप आता अजय महाराज बारसकर यांनी जरांगे यांच्यावर केला आहे. Maratha Reservation Manoj Jarange
राजकारणासाठी मनोज जरांगेंची लढाई
तसेच मनोज जरांगे पाटील ज्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी निघाले होते, त्यावेळीही मनोज जरांगे यांनी जेवण केल्याचा आरोप अजय बारसकर महाराज यांनी केला. बारसकर पुढे म्हणाले की, मनोज जरांगे यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी आणि लेकरं बाळांसाठी नव्हती. ज्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायचं होतं. त्यांच्यासाठी जरांगे यांची ही लढाई होती.
मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघात केला. अजय महाराज बारसकर यांनी यापूर्वीही मनोज जरांगे यांच्यावर कडाडून टीका केली होती.
अजय बारसकर काय म्हणाले? Maratha Reservation Manoj Jarange
बारसकर म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं आंदोलन मनोज जरांगे यांनी निवडणुकीपर्यंत कसं भरकटवलं यासाठी ही पत्रकार परिषद आहे. मला काही लोकांनी सांगितलं, महाराज तुम्ही एक महिनाभर शांत राहा, त्यांना त्यांच्या पद्धतीने आंदोलन करू द्या, म्हणून मी शांत होतो. जरांगे यांच्यावर विश्वास होता, म्हणून त्यांना एवढा मोठा पाठिंबा मिळाला, पण आता अश्या काही घटना घडल्या, ज्याने त्यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे.
आरक्षणाचा लढा राजकीय लढा झाला
जरांगे यांनी लोणावळ्यात बंद दाराआड चर्चा केली. आरक्षणाचा लढा हा राजकीय लढा झाला. परवाच्या बैठकीला जे सच्चे मराठे गेले होते, त्या लोकांनी जरांगे यांना शिव्या घातल्या आहेत. अशोक चव्हाण हे परवा रात्री तिकडे गेले, जरांगे यांना भेटले आणि माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. तुम्ही म्हणाला होतात सीएम, डीसीएम सोबत फेसटाईमवर चर्चा केली आणि त्यावेळी मोबाईलवर मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केलं. अशोक चव्हाण यांच्या भेटीवेळी काय चर्चा झाली, त्याची रेकॉर्डिंग जगासमोर आणा, असेही बारसकर यावेळी बोलतांना म्हणाले.
Maratha Reservation Manoj Jarange
आंदोलनाचा किती मराठ्यांना फायदा झाला?
जरांगे पाटील लोकांना भ्रमित करतोय, असे टीकास्त्र बारसकर यांनी सोडले. तिकडे अरविंद केजरीवाल चौकशीला घाबरले नाहीत, तुम्ही कशाला घाबरताय. हा दहावी बारावी छाप, पास झाला की नापास माहिती नाही, पण याने कसलंही ज्ञान नसताना सगळ्यांना भरकटवलं. लोकसभेत आपलं काही गुंतलं नाही. आरक्षण जे मिळणार आहे, ते राज्यात मिळणार आहे असे ते म्हणाले. खरंच असं आहे का? लोकसभेचा काहीच फायदा नाही का? किती मराठ्यांना फायदा झाला हे जरांगेंनी सांगावं.
जरांगे लोकांना भ्रमित करतोय
वाशिम जिल्ह्यातील एक भगिनी आहे. ती नायब तहसीलदार झाली होती, पण कुणबी प्रमाणपत्रामुळे ती कलेक्टर झाली असे भ्रामक विधान त्यांनी कालच्या सभेत केले. जरांगे लोकांना भ्रमित करत असल्याचा आरोप बारसकरांनी केला. तू कोणाच्या डोक्यावर हात ठेवतो ते सांग आम्हाला. बारामतीच्या डोक्यावर हात ठेवतो की आणखी कोणाच्या डोक्यावर हात ठेवतो, असा सवालही त्यांनी यावेळी जरांगे पाटलांना थेट विचारला.
जरांगे यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी नव्हती
मनोज जरांगे यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी आणि लेकरं बाळांसाठी नव्हती. ज्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायचं होत. त्यांच्यासाठी जरांगे यांची ही लढाई होती. त्यांनी जे काही सुरु केलं त्यानंतर मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले. ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावली गेली. एकेक मराठा अपक्ष उमेदवार उभा करण्याची पहिली डील झाली आणि आता मविआसोबत दुसरी डील सुरु आहे, असा आरोप बारसकर यांनी केला. मविआचा उमेदवार असेल तिथे उमेदवार उभा करणार नाही, ही दुसरी डील सुरू आहे. यांच्या आंदोलनाचा चार दोन लोकांना फायदा झाला, असेही ते म्हणाले. Maratha Reservation Manoj Jarange
जरांगे आता SIT चौकशीला घाबरले?
जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबतही त्यांनी गौप्यस्फोट करत आरोप केले. वाशीमध्ये ज्यादिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं, त्याच्या आदल्या दिवशी मटण खाल्लं. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी ज्यावेळी यायला निघालात त्यावेळी तुम्ही रात्री जेवण केलत. ज्यांच्या हाताने तुम्ही उपोषण सोडलं, त्या महिलेने तिसऱ्या दिवशी नवी कोरी गाडी घेतली. कुठून आले पैसे?, असा खडा सवालही बारसकर यांनी विचारला. तुम्ही आता फडणवीस साहेब फडणवीस साहेब म्हणायला लागले. एसआयटी चौकशीला घाबरलात, असा आरोप बारसकर यांनी जरांगे यांच्यावर लावला.