Girish Mahajan On Eknath khadse | विझलेल्या दिव्याबद्दल एवढं का बोलता?, गिरीश महाजनांचा खडसेंवर हल्लाबोल

गिरीश महाजन यांना एकनाथ खडसेंवर पुन्हा हल्ला चढवला आहे. एकनाथ खडसे स्वगृही परतणार आहेत. तरीदेखील त्यांना देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याकडून विरोध होत असल्याचे दिसत आहे. तसेच, त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांना हे दोन्ही नेते पुन्हा स्वीकारतील आणि त्यांच्यातील दुरावा कमी करतील की हा दुरावा आणखी किती वाढणार! आता यावर गिरीश महाजन काय म्हणाले पाहुयात…

एकनाथ खडसे येत्या 15 दिवसांत भाजपत प्रवेश करणार

अहो, त्यांना 7 लोकांची ग्रामपंचायत सुद्धा राखता आली नाही. त्यांच्या पत्नी सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये पडल्या. आमदारकीमध्ये सुद्धा त्यांची मुलगी पडली. बँक होती ती सुद्धा त्यांच्या हातातून गेली, त्यांच्याकडे काय राहिले आहे? जो दिवा विझलेला आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही एवढं का विचारता, असे म्हणत भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला. (Girish Mahajan On Eknath khadse)

हिंगोली लोकसभेत झालेली बंडखोरी रोखण्यासाठी आज (दि.7) गिरीश महाजन हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. दौऱ्या दरम्यान त्यांनी माध्यमाची संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

हिंगोलीत गिरीश महाजन धावून आले (Girish Mahajan On Eknath khadse)

गिरीश महाजन म्हणाले, भाजपचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी फॉर्म भरुन ठेवले होते. त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. पुढे रामदासजी त्यांच्याकडे पण आम्ही चाललो. योगी श्याम भारती महाराज यांची आणि आमची बराच वेळ चर्चा झाली. मागील अनेक दिवसांपासून ते काम करतायेत. त्यांचा परिवार खूप मोठा आहे,त्यांचे फॉलोवर्स मोठ्या संख्येमध्ये आहेत. उमेदवारी मिळावी, अशी त्यांची मागणी होती.

हिंगोलीची जागा शिवसेनेची

परंतु, ही जागा शिवसेनेची आहे. यात कुठलाही बदल झाला नाही फक्त उमेदवार बदललाय. शिवसेनेची जागा असल्यामुळे आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकत नाहीत. ही जागा भाजपकडे असली तर (Girish Mahajan On Eknath khadse)आम्ही निश्चित त्यांचा विचार केला असता. कुठल्याही परिस्थितीमध्ये मताचा विभाजन होऊ नये. एक एक जागा आपल्याला महत्त्वाचे आहे. मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आहे. आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली, असंही गिरीश महाजन यांनी सांगितले.

भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज

रामदास पाटील यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे. ते घरी थांबलेले आहेत. त्यांच्या घरी चाललोय शेवटी युती आहे. ते आमचे जर पदाधिकारी आहेत. त्यांना उमेदवारी मागे घ्यावी लागेल. अशा पद्धतीने उमेदवारी दाखल करून कोणी उमेदवारी मागे घेणार नसेल तर असं चालणार नाही. आमचं लक्ष आता मोदीजी आहेत, त्यांना पंतप्रधान करायचे आहे. अपेक्षित नसेल एवढ्या मोठ्या संख्येमध्ये खासदार आम्हाला निवडून आणायचे आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षातील उमेदवारांनी अपक्ष फॉर्म भरले त्यांचे सर्वांचे घेण्यासाठी विनंती केली जाणार आहे, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. (Girish Mahajan On Eknath khadse)

Leave a Comment