संदिपान भुमरेंना उमेदवारी दिली तर चांगलं होईल-अंबादास दानवे | Ambadas Danve on Loksabha Election 2024

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. दानवेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलेलं दिसतंय. दानवे म्हणाले की, जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिली तर चांगलं होईल.

Ambadas Danve on Loksabha Election 2024

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. अशात छत्रपती संभाजीनगरमध्ये घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मतदारसंघात दौरा करत आहेत. यावेळी शिंदे गटाच्या उमेदवारीवर त्यांनी भाष्य केलं आहे.

उमेदवार ठरवायला दिल्लीला जावं लागतं

एकनाथ शिंदे शिवसेना चांगल्या पद्धतीने वाचवत आहे. उमेदवार बदला म्हणायची हिंमत पूर्वी कुणाची नव्हती. आता उमेदवार ठरवायला दिल्लीला जावं लागतंय. मागच्या वेळी किरीट सोमय्या यांची उमेदवारी शिवसेनेने बदलायला लावली होती. आता शिवसेनेची काय अवस्था आहे, आपल्याला माहिती आहे, असं दानवे यांनी म्हटलं.

भुमरेंना उमेदवारी दिल्यास चांगले होईल

शिवसेना शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावर दानवेंनी भाष्य केलं. संदिपान भुमरे यांचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. आमचा उमेदवार निश्चित होऊन 15 दिवस झालेले आहेत. भुमरे यांचे नाव निश्चित झाल्यास चांगले आहे. कारण ते आमच्या लोकसभा मतदारसंघातले नाहीत. पुढे कसं करायचं त्यांचं ते आम्ही ठरवू, असे अंबादास दानवे म्हणाले.

सकाळी 7 पासून मी प्रचाराला सुरुवात केली आहे. आतापर्यंत मी पाच ते 7 ठिकाणी गेलो. आज 18 ठिकाणी भेटी देणार आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्वतःला वाचवण्यासाठी गद्दारी केली

तुमच्यासाठी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही उमेदवारी देऊ शकत नाही. तुम्ही काय शिवसेना वाचवणार तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी गेलेला आहेत. भारतीय जनता पार्टी कसं एकेकाचे ऑपरेशन करते हे तुम्हाला लवकर कळेल.

…ही नमक हरामी आहे.

गोवा बिहार इथे भाजप कशी वागली आहे. तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचे सुख भाजप उपभोगू देणार नाही. तुम्ही इतके दिवस काम केलं ते काय घरगडी म्हणून काम केलं का? मग याच घरगड्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नगरविकास खातं कसं दिलं? उध्दव ठाकरे इतरांना सहकारी समजतात. तरीही तुम्ही हे बोलत असाल तर ही नमक हरामी आहे, असं विधान अंबादास दानवे यांनी केलं आहे.

नाहीतर शेलारांना कुत्रा विचारणार नाही

आशिष शेलार यांनी आज सकाळी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेलार यांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी लागते, नाहीतर त्यांना कुत्रा विचारणार नाही. ठाकरेंवर टीका करण्यासाठी शेलार यांचं काहीतरी ठरलं असणार आहे. चांगलं काम करतात हे तीन नेते, महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट हे तिन्ही नेते करत आहेत. 15 टक्क्यांशिवाय काम करत नाहीत, भूखंड लाटत असतात, हे काम उध्दव ठाकरे यांना करता येत नाही. सलमान खान कलाकार आहे भेटणं काही विशेष नाही, असं अंबादास दानवे म्हणालेत.

Leave a Comment