Vijay Wadettiwar On Raj Thackeray राज ठाकरे (Raj Thackeray) हे भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेला पडलेला आहे. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे हे दिल्लीत जाऊन त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही केली. त्यासोबतच ते भाजपत जाणार का? आणि त्यां
ना भाजप लोकसभेसाठी सोबत घेणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यावर आज राज ठाकरे गुढीपाडव्या मेळाव्यात यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. Vijay Wadettiwar On Raj Thackeray
मनसेचा आज मुंबईत गुढीपाडवा मेळावा आहे. या मेळाव्यात राज ठाकरे आपली भूमिका मांडणार का? याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागून आहे. तसेच भाजपसोबत जाणार की नाही याबाबत त्यांनी अधिकृत प्रतिक्रियाही दिलेली नाही. यावरूनच आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
वाघाचा कोल्हा करण्याचा प्रयत्न
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, राज ठाकरे हा वाघ माणूस होता. पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न सध्या सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. राज ठाकरे हे कायमच मी दिल्लीसमोर झुकणार नाही, असे सांगत असतात. मात्र आता त्यांनाच दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. यात कुठेतरी राज ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम होत आहे का? त्यांना पिंजऱ्यात अडवण्याचं काम होतंय का? अशी शंका महाराष्ट्राच्या जनतेला आहे.
Vijay Wadettiwar On Raj Thackeray
आज मनसेचा (MNS) गुढीपाडवा मेळावा
राज ठाकरे आजच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात जी भूमिका मांडतील, ती कदाचित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नसेल, असा सर्वांचा कयास आहे. राज ठाकरे हे दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकणार नाही, हीच मराठी माणसांची अपेक्षा आहे. त्यामुळेच आज राज ठाकरे हे जे बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असेल, असे मला वाटतं असल्याचेही वड्डेटीवार यावेळी म्हणालेत.
राज ठाकरे भाजपबरोबर (BJP) जाणार!
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. ही भेट मनसेच्या महायुतीतील सहभागाबद्दल असल्याचे बोलले जात होते. मनसेने लोकसभेच्या 2 किंवा 3 जागा मागितल्याची चर्चाही सुरू आहे. तसेच अमित शाह यांच्याबरोबरच्या भेटीत नेमके काय ठरले? मनसे महायुतीत जाणार की नाही? अशा अनेक मुद्यांवर आज राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे.
मनसेच्या टीझरमध्ये काय? MNS Teaser
मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज मुंबईत होत आहे. या मेळाव्याचा टीझर मनसेकडून दोन-तीन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये राज ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडिओ असून त्यामध्ये ते असे म्हणत आहेत की, गेल्या काही आठवड्यांपासून आपल्या पक्षाबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. याकडे मी शांतपणे पाहत आहे. तुम्हाला देखील अनेकांनी प्रश्न विचारुन भंडावून सोडले असेल. या सगळ्यांवर आता बोलण्याची वेळ आली आहे. नक्की काय घडतंय, घडवलं जातंय, हे सांगण्याची वेळ आली आहे. 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, आपल्याशी बोलायचे आहे, असे या टीझरमध्ये म्हटले आहे.