गुढीपाडव्यानिमित्त आज संपूर्ण राज्यात जल्लोष आहे. घरोघरी गुढी उभारून प्रत्येकजण गुढीपाडव्याचा सण साजरा करत असतो. तसेच येणाऱ्या पुढील नववर्षाचेही हे स्वागतच… हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला खऱ्या अर्थाने नवीन वर्षाला सुरुवात होते. हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस म्हणूनही मनवला जातो. तसेच गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्राही काढल्या जातात. या शोभायात्रेला मराठी कलाकारांचाही भरघोस असा प्रतिसाद मिळतो. Prajakta Mali On Election 2024
गुढीपाडव्यानिमित्त नागपुरात निघालेल्या शोभायात्रेत अभिनेत्री प्राजक्ता माळीही सहभागी झाली होती. यावेळी तिने प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुंषंगाने भाष्यही केलं आहे. तर पाहुयात नेमकं प्राजक्ता माळी निवडणुकीवर काय म्हणाली… Prajakta Mali On Election 2024
अभिनेत्री प्राजक्ता माळी काय म्हणाली?
प्राजक्ता माळी म्हणाली की, आम्हाला सगळ्यांना हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हिंदू नववर्षाचं स्वागत खरंच उत्साहात, जल्लोषात झालं पाहिजे. इतक्या सकाळी हिंदू जनता नववर्षाचं स्वागत करण्यासाठी नटून थटून जमली आहे. सनातन धर्म हा हजारो वर्षांपासून चालत आलेला आहे. आज सूर्य चंद्र मेष राशीत प्रवेश करतात. निसर्ग चक्रानुसार आज खऱ्या अर्थाने नववर्षाला सुरुवात होते. आणि तेच आपणही फॉलो करतो. नव्या वर्षात खूप काम करायचं आहे, प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे, हाच संकल्प आहे.
Prajakta Mali On Election 2024
सुट्टी घेऊन गायब होऊ नका, मतदान करा
गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत काही राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. लोकसभेच्या निवडणुकांबाबत मतदारांना काय आवाहन कराल? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर प्राजक्ता म्हणाली, मतदारांना हेच सांगायचं आहे की मतदान करा. सुट्टी घेऊन गायब होऊ नका. नोटाला मत देऊ नका. कोणाला तरी मत द्या. अभ्यास करा… माहिती करून घ्या. मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन फिरायला जाण्याचे भोग आपण नंतर भोगतो. त्यामुळे अशी माती खाऊ नका. अभ्यासपूर्वक आणि विचारपूर्वक मतदान करा. सध्या महाराष्ट्रातील अवस्था पाहता आपण सगळ्यांनी जागरुक राहणं महत्त्वाचं आहे. Prajakta Mali On Election 2024