अवकाळीच्या अवकळा, शेतकऱ्यांना झळा | Unseasonal Rain In Maharashtra

महाराष्ट्राच्या तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं सावट ओढवलं आहे. वर्धा, अमरावती आणि जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या तीन्ही जिल्ह्यांत अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या अवकळा झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. या अवकाळीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई करण्याचे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. Unseasonal Rain In Maharashtra

जळगाव जिल्ह्यात अवकाळीची हजेरी

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात तर तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअस पार गेला आहे. अशातच अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील इतरही काही भागात अवकाळी पाऊस पडला. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे.

यंदा महाराष्ट्रात जोरदार सरी बरसणार : स्कायमेटचा अंदाज

अमरावतीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात आज सकाळी गारपीटसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. चांदुर बाजार तालुक्यातील गहू, संत्रा, कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. थुगाव आणि पिंपरीमध्ये गारपीट झाल्याने संत्री, गहू, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. Unseasonal Rain In Maharashtra

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसावर प्रतिक्रिया दिली आहे. अवकाळी पाऊस, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, चाऱ्याच्या प्रश्नासंदर्भात बोललो आहे. मुख्य सचिव, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कामे होतील, त्यांना सूचना दिल्या आहेत. कुठे काही कमी पडणार नाही, याची काळजी घेऊ. आम्ही नुकसान भरपाई देण्याचे काम करू. पंचनामे करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, निवडणुका होत राहतील, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. Unseasonal Rain In Maharashtra

अवकाळी पावसाचा तीन जिल्ह्यांना फटका

गुढीपाडव्याच्या दिवशीच राज्यातील 3 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलं आहे. महाराष्ट्रातील वर्धा, जळगाव आणि अमरावती या 3 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे काही भागात गारांचा देखील पाऊस पडला आहे. वर्धा शहरासह जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस बरसला. त्यानंतर आज सकाळी विविध भागात पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्यात.

मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. मध्यरात्रीच्या सुमारास वर्धा शहरात गारपीटही झाली. अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला, पण शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे उन्हाळी पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर भागात यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गारपीटमुळे तीळ, कोहळ, टरबूज, लिंबू यासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. Unseasonal Rain In Maharashtra

Leave a Comment