शशी थरूर यांच्यावर मानहानीचा आरोप | Rajeev Chandrasekhar Defamation Notice Shahi Tharoor

Rajeev Chandrasekhar Defamation Notice Shahi Tharoor | लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. सत्ताधारी तसेच विरोधक आपापल्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप हे करत असतात. अशा परिस्थितीत आता केरळमधील भाजपचे उमेदवार असलेले राजीव चंद्रशेखर यांच्यावर काँग्रेसचे उमेदवार शशी थरूर यांनी काही आरोप केले होते. या आरोपांचे खंडन करत आज भाजप उमेदवार चंद्रशेखर यांनी शशी थरूर यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे.

लोकसभेचा गैरफायदा घेण्यासाठी चंद्रशेखर यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप राजीव चंद्रशेखर यांनी थरूर यांच्यावर केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शशी थरूर यांनी राजीव चंद्रशेखर यांच्यावर काही आरोप केले होते. ते आरोप खोटे असल्याचे सांत चंद्रशेखर यांनी थरूर यांना माफी मागण्याचे सांगितले आहे. Rajeev Chandrasekhar Defamation Notice Shahi Tharoor

नेमकं प्रकरण काय? समजून घेऊयात…

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केरळमधील एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलत असतांना काँग्रेस उमेदवार असलेल्या शशी थरूर यांनी भाजप उमेदवार राजीव चंद्रशेखर यांच्यावर मतदारांना पैसे वाटणे आणि ख्रिश्चन समुदायाविरोधात खोटी माहिती पसरवल्याचा आरोप केला. ही मुलाखत सहा एप्रिल रोजी प्रसारित करण्यात आली होती.

थरूर म्हणाले होते की, राजीव चंद्रशेखर यांनी एका विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक नेत्यांना पैसे देऊ केले आहेत. त्यामुळे हा वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर चंद्रशेखर यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रशेखर म्हणाले की, थरूर यांनी केलेलं हे विधान पूर्णपणे खोटं आहे. तसेच, निवडणुकीच्या काळात माझी प्रतिमा डागाळण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासोबतच त्यांनी आता शशी थरूर यांना त्यांची माफी मागण्याचे सांगितले आहे. त्यासाठी थरूर यांना 24 तासांचा मुदत देण्यात आली आहे.

प्रतिमा डागाळल्याचा आरोप

लोकसभेचा गैरफायदा घेण्यासाठी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप राजीव चंद्रशेखर यांनी केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शशी थरूर यांनी राजीव चंद्रशेखर यांच्याबाबत विधान केले होते. Rajeev Chandrasekhar Defamation Notice Shahi Tharoor

शशी थरूर यांनी जाहीर माफी मागावी-चंद्रशेखर

शशी थरूर यांनी राजीव चंद्रशेखर यांच्यावर मतदारांना पैसे वाटण्याचा आणि ख्रिश्चन समुदायामध्ये खोटे पसरवल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राजीव चंद्रशेखर यांनी मानहानीची नोटीस पाठवली आहे. यासोबतच शशी थरूर यांनी आपल्यावर केलेले आरोप मागे घ्यावेत आणि त्याबद्दल जाहीर माफी मागावी, यासाठी राजीव चंद्रशेखर यांनी 24 तासांचा अवधी त्यांना दिला आहे. Rajeev Chandrasekhar Defamation Notice Shahi Tharoor

थरूर यांनी अफवा पसरवणे थांबवावे-चंद्रशेखर

शशी थरूर यांनी एका मुलाखतीत राजीव चंद्रशेखर यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांची प्रतिमा डागाळण्याच्या उद्देशाने हे आरोप करण्यात आले आहेत. शशी थरूर यांनी यासाठी बिनशर्त जाहीर माफी मागावी आणि आपली विधाने मागे घ्यावीत. भविष्यात अशी खोटी विधाने करणे आणि अफवा पसरवणे थांबवावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. Rajeev Chandrasekhar Defamation Notice Shahi Tharoor

Leave a Comment