काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. काल रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपूरची प्रचारसभा संपवून राहत्या घरी सुकळी गावाला जात असतांना भिलेवाडा या गावाजवळ पटोलेंच्या गाडीचा अपघात झाला. मात्र या अपघाताच्यावेळी कोणीही कारमध्ये उपस्थित नसल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. परंतु या अपघातानंतर सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी होत आहेत. Nana Patole Car Accident
भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यादरम्यान एका ट्रकने पटोलेंच्या गाडीला जोरदार धडक दिली. कारला धडक बसली तेव्हा सर्वजण कारमधून खाली उतरलेले होते. त्यामुळे या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. पण कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाना पटोले हे या अपघातामधून थोडक्यात बचावले आहेत. अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पुढील तपास सुरू आहे. ट्रकचालकाचे ट्रकवरील नित्रंयण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अपघातानंतर नाना पटोले यांच्याकडून घातपाताचा आरोप
आमच्या वाहनाला एका ट्रकने मुद्दाम धडक दिली असा गंभीर आरोप अपघातानंतर नाना पटोले यांनी केला आहे. आम्ही तर यातून बचावलो, सुखरूप राहिलो पण गाडीचं बरंच नुकसान झालं. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप राहिलो, कोणी काळजी करू नये, असे पटोले यांनी स्पष्ट केले. मात्र हा अपघात म्हणजे घातपात होता की काय? याचा पोलिस तपास करतील असेही पटोले यांनी नमूद केले आहे. Nana Patole Car Accident
अतुल लोंढेंचा भाजपला थेट सवाल
या अपघातानंतर आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना या मुद्द्यावरून घेरण्यास सुरुवात केली आहे. हा अपघात घातपात असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. तसेच, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा थेट सवाल अतुल लोंढे यांनी भाजपला केला आहे. Nana Patole Car Accident
नाना पटोले सुखरूप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री भिलेवाडा या गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशीर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप असल्याचे लोंढे यांनी ट्वीट केले आहे. Nana Patole Car Accident